सस्नेह
नमस्कार !
पर्वती परिसरात मराठी माध्यमातून दर्जेदार शिक्षण द्यावे व विद्यार्थी
सुसंस्कारित व्हावेत या उद्देशाने मध्यमवर्गीय शिक्षणप्रेमी रहिवाशांनी ही
शिक्षणसंस्था स्थापन केली आहे.
सुमारे ४०-४५ वर्षापूर्वी मित्रमंडळ वसाहती मधील सरिता महिला
मंडळाने एक नवीन उपक्रम म्हणून बालवाडीचे वर्ग चालू केले. त्यासाठी
मित्रमंडळ हौसिंग सोसायटीने जागा उपलब्ध करून दिली. आजूबाजूच्या
परिसरातील पालकांनी त्यास प्रचंड प्रतिसाद दिला. लहान मुलांची जवळच
सोय झाल्याने इयत्ता १० वी पर्यत शाळा वाढवावी असा आग्रह पालक करू
लागले. शैक्षणिक ट्रस्ट वेगळे अस्तीत्व असावे म्हणून १९८३ साली मित्रमंडळ एज्युकेशन सोसायटी
असा ट्रस्ट
स्थापन केला. क्रमांक १९५० अन्वये त्याची अधिकृत नोंदणी झाली त्याची घटना तयार केली सध्या
या संस्थेमार्फत पर्वती परिसरात जगताप हाऊस / वनराई कार्यालयासमोर
“ इंद्रधनू बालवाडी” , “सरिता प्राथमिक शाळा” व “सुंदरदेवी राठी
हायस्कूल” या मराठी माध्यमाच्या शाळा चालविल्या जातात.