1) वाचन प्रकल्प –
विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी व वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून प्रथमफौंडेशन तर्फे
वाचन प्रकल्प राबविला जातो.
2) विशेष विद्यार्थ्यांसाठीरेमेडीअल टिचिंग - अभ्यासात गती कमी असलेल्या
विद्यार्थ्यांसाठीधृव एज्युकेशनल अँड रीसर्च फाउंडेशन तर्फे विशेष आठवड्यात काही दिवस मार्गदर्शन
केले जाते.
3) अभिव्यक्ती –मुलांमधील कला-गुणांचा विकास व्हावा व मुलांनी विविध
माध्यमातून व्यक्त व्हावे यासाठी अभ्यासिका लर्निंग अँड रिसोर्स सेंटरच्या वतीने अभिव्यक्ती हा
अभिनव उपक्रम घेतला जातो.
4) इंग्रजी भाषा विकास - इंग्रजी विषयाची भिती जावी व
भाषा समजावी, बोलता यावी यासाठी दरवर्षी विशेष योजना केली जाते.
5) समुपदेशन –शारीरिक, मानसिक रोगांना योग्य ती दिशा
देण्यासाठी समुपदेशन केले जाते.
6) इंटरॅक्टक्लब –
नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी यासाठी इंटरॅक्टक्लब आहे.
7) व्याख्यानमाला -
.८ वी ते १० वी करीता विविध विषयातील तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शनपर व्याख्यानमाला आयोजित केल्या
जातात.
8) जीवन व्यवहार प्रशिक्षण -
विद्यार्थ्यांना जीवनातील दैनंदिन व्यवहाराची माहिती व्हावीयासाठी जीवन व्यवहार शिकविला जातो.
9) कार्यशाळा - विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यशाळा
घेतल्या जातात.
10) विविध प्रदर्शने -
वर्षभरात विविध विषयांची सखोल माहिती होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन
विविध प्रदर्शनांचे आयोजन केले जाते.
11) शिक्षक-पालक समन्वय -पालकांना आपल्या पाल्याचा विकास
समजावा व पालक शिक्षकांमध्ये संवाद व्हावायासाठी वेळोवेळी पालक सभा घेतल्या जातात.
13) पालक शिक्षक संघ -शाळेच्या विविध योजना पालकांपर्यंत पोहोचवणे व शाळा-पालक यांच्यात स्नेह निर्माण व्हावा यासाठी पालक शिक्षक संघ स्थापन केला आहे .
14) शाळा व्यवस्थापन समिती -विविध आयामांना संघटीत करून शाळेच्या विकासासाठी शाळा व्यवस्थापन समिती आहे.